माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य
मालवण येथील बास्केटबॉल स्पर्धेचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन ; खेळाडूंच्या दर्जेदार खेळाचे केले विशेष कौतुक
अमित खोत | मालवण : माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेब यांनी नेहमीच समाजातील सर्व स्तरातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. दुर्लक्षित घटकांना प्राधान्याने न्याय दिला. आज त्यांचा वाढदिवस साजरा होत असताना भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन सर्व ठिकाणी करण्यात आले आहे. हा महोत्सव क्रिकेट, कबड्डी पुरता मर्यादित नसून सर्वच खेळ आणि खेळाडूंना न्याय मिळावा हा उद्देश आहे. मालवण येथे आयोजित बास्केटबॉल स्पर्धेत खेळाडूंचा दर्जेदार खेळ पाहता खऱ्या अर्थाने हा महोत्सव यशस्वी ठरत आहे. या खेळाला अधिक उंची प्राप्त करून देण्यासाठी खेळाडूंना आवश्यक ते सहकार्य मिळावे यासाठी आपण प्रयत्नाशील राहू. असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी मालवण येथे बोलताना केले.
माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यात क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून निमंत्रित संघांची भव्य बास्केटबॉल स्पर्धा मालवण टोपीवाला हायस्कुल मैदानावर आयोजित करण्यात आली. या स्पर्धेला आमदार निलेश राणे यांनी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. बास्केटबॉल खेळात सहभागही घेतला. स्पर्धेचे उदघाटन आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. बाबा परब यांच्या नेतृत्वातील या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आमदार निलेश राणे यांनीही स्पर्धा आयोजनाचे विशेष कौतुक केले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजपा शहराध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, माजी सभापती अजिंक्य पाताडे, माजी उपसभापती राजू परुळेकर, खरेदी विक्री संघ संचालक आबा हडकर, महेश मांजरेकर, गोळवण सरपंच सुभाष लाड, भाजपा युवामोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, शिवसेना माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, मिलिंद झाड, दाजी सावजी, छोटू सावजी, रवी टेंबुलकर, नंदू देसाई, निनाद बादेकर, अमु हर्डीकर यांसह महिला पदाधिकारी वैष्णवी मोंडकर, महिमा मयेकर, पुजा वेरलकर, अमिता निवेकर, महानंदा खानोलकर तसेच अन्य पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते.
स्पर्धेतील पहिला सामना अतिशय रोमहर्षक झाला. दोन वेळा बरोबरीत सुटलेल्या या सामन्यात मालवण संघाने कोल्हापूर संघाचा पराभव करत विजय मिळवला. या संपूर्ण सामन्यात आमदार निलेश राणे यांची उपस्थिती लाभली. खेळाडूंनी आमदार निलेश राणे यांच्या सोबत फोटो सेल्फी साठी मोठी गर्दी केली











