मंडणगड l प्रतिनिधी : पेवे येथील आरोग्य उपकेंद्रांचे समुह आरोग्य अधिकारी हे पुर्वीच्या अधिकाऱ्यांच्या तुलनेत कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांना उत्तम आरोग्य सेवा देत असल्याने या गावास आवश्यकता असल्याचे प्रतिपादन येथील सरपंच, उपसरपंच कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून करण्यात आले नमुद अधिकाऱ्यांचे विरोधात तालुका वैद्यकीय अधिकाऱी यांच्या कार्यालयाकडे तालुक्यातील आशा संघटनेकडून काही दिवसापुर्वी करण्यात आलेल्या सामुहीक तक्रारीनंतर वैद्यकीय क्षेत्र चांगलेच ढवळून निघाले आहे. या पार्श्वभुमीवर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत पेवे यांच्याकडे नमुद अधिकाऱ्याबद्दल अहवाल मागीतल्याने 7 एप्रिल 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय पेवे येथे उंबरशेत सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांची सभा आयोजीत करण्यात आली होती. या सभेत ग्रामस्थांनी वादी व प्रतिवादी यांची बाजू ऐकून घेऊन ग्रामपंचायतीचे या विषया संदर्भातील मत तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी कळवले आहे.
पंदेरी आऱोग्य केंद्रांचे अंर्तगत पेवे आरोग्य उपकेंद्रांत कार्यक्षेत्रात पेवे, उबरशेत गवाणवाडी या तीन गावांचा समावेश होतो. व गेल्या जुन महिन्यापासून विद्यमान समुह आरोग्य अधिकारी हे आपल्या कामावर हजर झाल्यापासून वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ झाली आहे. या उपकेंद्रांस पुर्ण महिन्यात आवश्यक असणारी ओपीडीची 72 रुग्णांचे तपासणीचे लक्ष सध्या तिपटीने म्हणजे महिन्याला 200 हुन अधिक रुग्णांची तपासणी केली जाते. रुग्णांची व्यक्तिगत काळजी घेतली जाते. डोंगराळ संरचना लक्षात घेऊन रुग्णाना सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी जातीने प्रयत्न केले जातात, आरोग्य विभागाची विवध अभियाने, वैद्यकीय शिबीरे यांचे आय़ोजन केले जाते. ग्रामिण भागातील वृध्द गरीब रुग्णांची मोठी सोय या निमीत्ताने उभी राहीलेली असल्याचे पेवे येथील ग्रामस्थांचे मत आहे. ग्रामिण भागात वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने यंत्रणेतील सर्व घटकांची जबाबदारी बनते की, त्यांनी उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य पध्दतीने काम करुन घ्यावे. आम्ही आमच्या या संदर्भातील भावना संबंधीत अधिकाऱ्यांकडे योग्य पध्दतीने व रितसर मार्गाने पोहच करणार असल्याचे मत गावातील अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. ग्रामपंचायत पेवे यांच्याशी संपर्क साधला असता तेथे उपस्थित ग्रामस्थ बाळकृष्ण पवार, ग्रामपंचायत सदस्य महेश पवार, संजय दुर्गवले, रामदास दुर्गवले, विश्वनाथ टक्के, रमेश बोर्ले यांनी पत्रकारांना या विषया संदर्भात माहीती दिली. दरम्यान गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामपंचायत पदाधिकारी यांनीही समूह आरोग्य अधिकारी यांच्या कामाबद्दल चांगले मत व्यक्त केले आहे.









