मंडणगड शहरात दफनभुमीसाठी एक एकर जागा उपलब्ध करुन द्यावी

शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना तालुका शाखा मंडणगड यांची प्रशासनाकडे मागणी

मंडणगड | प्रतिनिधी : शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, तालुका शाखा मंडणगड यांच्यावतीने वीरशैव लिंगायत समाजाचे दफन भूमीचे मागणीसाठी १३ फेब्रुवारी २०२३ रोजी नगराध्यक्षा अँड. सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे याचबरोबर तहसीलदार विजय सुर्यवंशी यांचेकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शिवा संघटना मंडणगड तालुका अध्यक्ष संदिप तोडकर , सचिव गजानन जंगम सदस्य श्री.यशवंत जंगम, सौ.कमल जंगम, श्रीमती शुभांगी तोडकर, योगेश जंगम, गणपत जंगम, रविंद्र जंगम, शंकर जंगम, शिवा जंगम, सौ.विमल जंगम, सौ. शेवंती जंगम, कु. रविकिरण जंगम आदी उपस्थित होते. यावेळी निवेदनात सादर करण्यात आलेल्या माहीतीनुसार वीरशैव लिंगायत समाज बांधव मंडणगड शहरात पुर्वीपासून रहात आहेत व नोकरी व्यवसायाकरिता अनेक समाज बांधव शहरात नव्याने स्थाईक दाखल झाले आहेत. वीरशैव समाज बांधवाना मृत्यू पश्चात दफन करण्याची पध्दती आहे परंतू मंडणगड शहरात वीरशैव समाज बांधवाना त्यांच्या धर्म पंरपरेप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याकरिता दफनभूमीच उपलब्ध नाही त्यामुळे धर्मपरंपरे प्रमाणे दफन विधी करणे शक्य होत नाही त्याकरिता दफनभुमीसाठी वैरशीव लिंगायत समाजास शासनाचे अखत्यारितील एक एकर जागा निश्चीत करुन द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे आहे. निवेदनावर युवक संघटनेचे अध्यक्ष संदीप तोडकर यांच्यासह समाजबांधवाचटी सही असून निवदेनाची प्रत जिल्हाधिकारी रत्नागिरी व प्राताधिकारी दापोली यांना पोहच करण्यात आली आहे.