मांगेली येथील युवकाचा गांधील माश्यांचे हल्ल्यात मृत्यू

गोवा बांबोळीत उपचारा दरम्यान निधन

दोडामार्ग प्रतिनिधी
मांगेली येथे गांधील माशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका युवकाचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. रामदास गोविंद गवस (४३) रा. मांगेली – तळेवाडी असे त्यांचे नाव असून रामनवमी दिवशी त्यांच्यावर गांधील माशांनी हल्ला केला होता. रामदास गवस हे रामनवमी दिवशी आपल्या काजूबागेत काजू गोळा करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर गांजिल माशांनी हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी साटेली भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बांबोळी गोवा येथे हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.