आम.निरंजन डावखरे यांच्या निधीतून वाटप
गुहागर l प्रतिनिधी :कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार आणि भाजप नेते निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून जि. प. शाळा नं. १ घाडेवाडीसाठी 1 संगणक व जि. प.शाळा नं. 3 नालेवाडीसाठी 1 प्रोजेक्टर प्रदान करण्यात आला. यामुळे शाळेच्या शिक्षक, विद्यार्थी आणि पालक वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
वेळंब सामाजिक कार्यकर्ते दीपक मोरे यांच्या विशेष प्रयत्नाने वेळंबचे उपसरपंच श्रीकांत मोरे,अपूर्वा बारगोडे, महेश घाग,समीर वेल्हाळ यांच्या सहकार्याने संगणक व प्रोजेक्टर या दोन्ही शाळांना प्राप्त झाले आहेत. दीपक मोरे यांनी यासाठी थेट आम.निरंजन डावखरे व निलिमा डावखरे यांच्याशी संपर्क केला होता.आम. निरंजन डावखरे व नीलिमा डावखरे यांचे शाळेच्यावतीने आभार मानले.
रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ५८ शाळांना आमदार डावखरे यांच्या निधीतून डिजिटल साहित्याचे वाटप करण्यात आले असून, शिक्षण क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.












