को रे मार्गावर वातानुकूलित उन्हाळी स्पेशल सेवेत

खेड (प्रतिनिधी) उन्हाळी सुट्टी हंगामासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेली एलटीटी-करमाळी वातानुकूलित साप्ताहिक स्पेशल ११ एप्रिलपासून कोकण मार्गावर धावू लागली आहे. २४ मेपर्यंत ही  स्पेशल धावणार आहे
  एलटीटी-करमाळी वातानुकूलित साप्ताहिक स्पेशल ११ एप्रिल ते २३ में दर शुक्रवारी धावेल. एलटीटीहून रात्री १०.१५ वा. सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १२ वा. करमाळीला पोहचेल. परतीच्या प्रवासात १२ एप्रिल ते २४ में दरम्यान दर शनिवारी धावणारी स्पेशल करमाळी येवून दुपारी २.३० वा. सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.५ वा. एलटीटीला पोहचेल. २० एलएचबी डब्यांच्या स्पेशलला खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी स्थानकात थांचे देण्यात आले आहेत.