खेड स्मशानभूमीतील लाकडे चोरीस

खेड (प्रतिनिधी) शहरातील नगर परिषदेच्या वैकुंठ स्मशानभूमीतील २० हजार रूपये किंमतीची जळावू लाकडे चोरट्याने चोरल्याची तक्रार येथील पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार   अज्ञात चोरट्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय मधुकर खैरे (रा. चाकाळे- बौद्धवाडी) यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. स्मशानभूमीतील शटरचे लॉक तोडून चोरट्याने गोडाऊनमध्ये प्रवेश करत लाकडे चोरल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.