न्यू इंग्लिश स्कूल उभादांडाच्या च्या गुरू शिष्या वक्तृत्व स्पर्धेत नंबर वन…

दोडामार्ग l प्रतिनिधी :भारतरत्न डॉ आंबेडकर आंबेडकर उत्सव समिती दोडामार्ग तालुका यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाची इयत्ता नववीतील शिकणारी विद्यार्थिनी कु. अमृता दत्ताराम नवार हिने समग्र महात्मा ज्योतिराव फुले या विषयावर भाष्य करताना या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला

याच ठिकाणी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय खुल्या गटातील वक्तृत्व स्पर्धेत या प्रशालेचे अध्यापक वैभव खानोलकर यांनी प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली.

खुल्या गटासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान हा विषय देण्यात आलेला होता या विषयावर भाष्य करताना भारतामधील सद्यस्थिती आणि महाराष्ट्रातील परिस्थिती यावर त्यांनी वास्तवाचे दर्शन घडवत संविधान महत्त्वाचं का आहे हे या स्पर्धेच्या माध्यमातून स्पष्ट गेले.

न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाची यशाची पंरपरा कायम राखत विद्यालयाचा शिरापेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या यशस्वी विद्यार्थिनीं कु.अमृता दत्ताराम नवार आणि या प्रशालेचे उपक्रमशिल अध्यापक या स्पर्धेतील खुल्या गटातील प्रथम क्रमांकाचे मानकरी प्रा. वैभव खानोलकर यांचे या दुहेरी यशासाठी विशेष अभिनंदन केले जात आहे. या विजेत्या स्पर्धकांचा गुणगौरव समारंभ लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती दोडामार्ग यांच्या वतीने दोडामार्गमध्ये संपन्न होणाऱ्या आंबेडकर जयंतीत विशेष गौरव होणार आहे.

या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री विरेंद्र कामत आडारकर उपाध्यक्ष निवृत्त गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर, सचिव रांगोळीकार रमेश नरसुले, सदस्य निलेश मांजरेकर आणि इतर सर्व संस्था पदाधिकारी व विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळा व्यवस्थापन समिती, पालक संघ यांनी केले असुन या यशस्वी विद्यार्थीनीला मार्गदर्शन करणारे सुप्रसिद्ध निवेदक तसेच मुलाखतकार, उपक्रमशील अध्यापक वैभव खानोलकर यांच्या सह लिपिक अजित केरकर व या यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांचे व या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या वैभव खानोलकर यांचे ही विशेष अभिनंदन केले आहे. सातत्याने विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत यश मिळवणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाचे या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वस्तरातून या गुरू शिष्याचे अभिनंदन होत आहे