भाजपा शिवसेना महायुतीच्या वतीने डिगस येथील विद्यार्थ्यांना खाउ वाटप

स्वप्निल | कदम : माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमिताने डिगस येथे भाजपा शिवसेना महायुतीच्या वतीने डिगस गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाउ वाटप करण्यात आले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी जयेश चिंचळकर ( युवा मोर्चा तालुका अध्यक्ष भाजपा ) , भिवाजी सावंत, शेखर गोसावी , अरुण सावंत,लक्ष्मीकांत राणे,प्रविण पवार ,विलास राणे ‘ उदय परब ,राजा पवार ,अनंत राणे,लिगांजी परब,पद्भनाभ मेस्त्री, बाबुनाथ गोसावी, व इतर पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी उपस्थित विध्यार्थी व पालकांनी खासदार नारायण राणे यांना शुभेच्छा देत आनंद साजरा केला.