डि.के.सावंत यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राची हानी

Google search engine
Google search engine

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची श्रद्धांजली

सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाची आणि विशेषतः मालवणी संस्कृती व खाद्यपदार्थांची सर्वदूर खऱ्या अर्थाने ओळख करून दिली ती आमचे मिञ स्व. डि. के. सावंत यांनी. पर्यटन जिल्हा घोषीत झाल्यावरही सरकारच्या मदतीची वाट न पहाता जिल्ह्यातील सृष्टिसौंदर्य आणि त्या अनुषंगाने पर्यटन चळवळ व त्यातून रोजगार ही संकल्पना सातत्याने राबवण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्च केल. त्यांचा व माझा परिचय सुमारे वीस वर्षांपासून माञ आपण देशाचा रेल्वेमंञी झाल्यावर कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून आपल्या सहकाऱ्यांना घेऊन ते अनेकदा दिल्लीत येत असतं. कोकण रेल्वेच्या प्रवाशांना विनासायास प्रवास करता आला पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. त्यांनी मांडलेल्या काही रास्त मागण्या मी रेल्वे मंत्री असताना पूर्ण केल्या होत्या. त्यांच्या अकाली निधनामुळे आपण एका पारदर्शी व समाजाभिमुख काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मुकलो आहोत. त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख पचविण्याचे सामर्थ्य परमेश्वराने देवो अशा शब्दांत प्रभू यांनी डि. के. सावंत यांना आदरांजली वाहिली आहे.