कणकवली : नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ सिंधुदुर्गची २७ एप्रिल रोजी सकाळी १०:३० वाजता न्यु इंग्लिश स्कुल कसाल येथे विशेष सभा आयोजीत केली आहे.सभासदांनी या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आले आहे.
या सभेवेळी प्राथमिक आश्रमशाळा जागेबाबत व शाळा स्थलांतराबाबत निर्णय घेणे अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणारे विषय व त्यावर चर्चा करणे. याबाबत कोणत्याही सुचना असल्यास त्या मिटींग पुर्वी २ दिवस अगोदर संस्थेकडे लेखी स्वरुपात पाठविणे आवश्यक आहे.कोरम अभावी सभा तहकुब झाल्यास त्याच ठिकाणी अर्ध्या तासाने घेण्यात येईल, अशा सूचना देखील दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केल्या आहेत.









