रत्नागिरी : उद्या दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता कॅपसन् इन्स्टिट्यूट कोटा रत्नागिरी शाखा व करिअर नीती या संस्थेमार्फत इयत्ता दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स सेमिनार कॅप्सन इन्स्टिट्यूट येथे आयोजित करण्यात आला आहे.
सदर सेमिनारला करियर नीती या संस्थेचे डायरेक्टर श्री.सुरज पाटील सर संबोधित करणार आहेत. या सेमिनार मध्ये दहावीनंतरच्या करियर्स बद्दल बरीच उपयुक्त माहिती सर्व पालक व विद्यार्थ्यांना मिळेल.
तरी सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी सदर सेमिनारचा लाभ घ्यावा असे आवाहन कॅप्सन इन्स्टिट्यूट मार्फत करण्यात येत आहे.
सेमिनार सकाळी 11 वाजता सुरू होईल.
पत्ता: कॅप्सन् इन्स्टिट्यूट, गुरुवर्य एम एन जोशी इंग्लिश मीडियम स्कूल, फाटक हायस्कूल समोर सुभाष रोड रत्नागिरी.
8055037222










