दापोली येथे भरडधान्य पाककृती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…….

भरारी बचत गट महासंघाचा उपक्रम

दापोली l प्रतिनिधी:- दापोली तालुक्यातील भरारी तालुका बचत गट महासंघातर्फे महिला सक्षमीकरण अंतर्गत भरड धान्य पाककृती स्पर्धेचे आयोजन दापोली येथील पद्मश्रद्धा सभागृह येथे करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक साक्षी पुलेकर नाचणीचा शिरा, द्वितीय क्रमांक शुभांगी मोरे नाचणी वरी केक तृतीय क्रमांक अंजली लयाळ नाचणीचे मोदक, उत्तेजनार्थ क्रमांक एक सुगंधा साखरकर नाचणी गुळपापडी उत्तेजनार्थ क्रमांक दोन मंजुषा डोळस नाचणी शुगर फ्री केक उत्तेजनार्थ क्रमांक तीन हर्षदा जोशी नाचणीचा फालुदा.या स्पर्धेचे परीक्षण प्रा.कुणाल मंडलीक आणि शिल्पा भोसले नाईक यांनी केले .बक्षीस वितरण समारोह करिता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली चे कुलगुरू डॉक्टर संजय भावे उपस्थित होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शैला अमृते होत्या. या प्रसंगी पंधरा वर्षे होऊन अधिक काळ भरावी बचत गट महासंघाची नौका यशस्वीपणे सांभाळणाऱ्या यशस्वी महिलांचा सन्मान कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांच्या हस्ते करण्यात आला.

किशोर अमृते , जया साळवी, भाऊ ईदाते यांनी बक्षिसांसाठीचे प्रायोजकत्व स्वीकारले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महासंघाच्या सचिव अस्मिता परांजपे आणि सदस्य गोमती अमृते यांनी केले. दापोली तालुक्यातील बहुसंख्य महिला या विशेष पाककृती स्पर्धेला उपस्थित होत्या.