रत्नागिरी : मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यामध्ये सकाळी : ९.३० वाजता करबुडे जिल्हा परिषद गटातील करबुडे विद्यालयास स्वनिधीतून मोफत संगणक संच ( डेस्कटॉप कम्प्युटर) भेट , सकाळी : ११.३० वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात बालरुग्णांना फळ वाटप, सायंकाळी ६.०० वाजता. तालुका संपर्क कार्यालय, गोडबोले स्टॉप, एअरपोर्ट रोड, रत्नागिरी येथे वाढदिवस अभिष्टचिंतन करण्यात येणार आहे.
सर्व महाराष्ट्र सैनिक व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका संघटनेकडून करण्यात आले आहे.












