संगमेश्वर तालुका क्रीडा संकुल विकासासाठी युवा सेना सहसचिव श्री. प्रद्युम्न माने यांनी घेतली क्रीडा मंत्री श्री. दत्तात्रय मामा भरणे यांची भेट

युवा सेना सहसचिव आणि संगमेश्वर तालुका क्रीड़ा समितीचे सदस्य श्री. प्रद्युम्न माने यांनी तालुका क्रीड़ा समिती अध्यक्ष आणि आमदार श्री. शेखर जी निकम सर यांच्या सोबत संगमेश्वर तालुका क्रीडा संकुल विकासासाठी क्रीड़ा व युवक कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. ना. श्री. दत्तात्रय मामा भरणे साहेब यांची नुकतीच मुंबई येथे भेट घेतली. भेटीदरम्यान संगमेश्वर तालुका क्रीडा संकुल येथे शासन नियमानुसार कबड्डी आणि खो-खो या खेळांसाठी इनडोअर स्टेडियम व्हावे अशी विनंती केली.