चिपळुणात मुंबईतील आंदोलना संदर्भात कुणबी समाज बैठकांचा झंझावात

 ९ रोजी मुंबई करणार चक्काजाम
 आरक्षण बचावसाठी समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चिपळूण (वार्ताहर) : ओबीसी प्रवर्गातील कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी सरकारने काढलेला जीआर आणि त्यासाठी घेतलेला हैदराबाद गॅझेटियरचा घेतलेला आधार या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी आणि सरकारने सरसकट कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना देऊ नये यासाठी ९ ऑक्टोबर रोजी मुंबई आझाद मैदानावरती जनआंदोलन कुणबी समाजाच्या वतीने होणार आहे. यासाठी चिपळूण तालुक्यात बैठका घेत जागृतीचा कुणबी झंजावात सुरुवात आहे. यासाठी सर्व संघटनाचे कुणबी पदाधिकारी गावोगावी बैठका होत असून समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सरकारने काढलेला जीआर यामुळे कुणबी समाजाचे मोठे नुकसान होणार आहे. ओबीसी प्रवर्गात मराठ्यांना घुसवणे आणि त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे हा कुणबी समाजावर अन्याय आहे. मुळातच कुणबी आणि मराठा हे वेगळे आहेत. तरीही राजकीय आरक्षणासाठी हा डाव आहे. त्यामुळे हा डाव हाणून पडण्यासाठी आता कुणबी समाज मुंबई आझाद मैदानावर लाखोंच्या संख्येने उतरणार आहोत असे वसंत उदेग यांनी सांगितले. समाज आता आपल्या हक्क अधिकारांसाठी लढणारा आहे. यासाठी चिपळूण तालुक्यातील विभागवार बैठका घेत जनजागृती होत आहे. कुणबी झंझावात सुरू झाला असून त्याला समाज बांधवांचा उत्स्फृत प्रतिसाद मिळत आहे. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई या मातृसंस्थेच्या माध्यमातून हा सर्व कुणबी समाज संघटनांना सोबत घेत हा एल्गार मोर्चा होत आहे. उद्योजक वसंत उदेग यांच्या अध्यक्षतेखाली आतापर्यंत चिपळूण शहर आणि ग्रामीण भागात बैठका होत आहेत. आपल्या हक्कांसाठी आणि पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी आझाद मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
चिपळुणात गावोगावी बैठका घेण्यासाठी कुणबी शिक्षण मंडळ चिपळूणचे अध्यक्ष उद्योजक वसंत उदेग, विश्ववस्त विलास खेराडे, समाज नेते दादा बैकर, चिपळूण ग्रामीण संघ शाखा अध्यक्ष संतोष कुळे, सचिव हर्षल कुळे, खजिनदार भरत धुलप, रतन पवार, रमेश राणे, कुणबी सेना जिल्हा सचिव प्रदीप उदेग, जिल्हाध्यक्ष दीनानाथ रावणंग , तालुकाध्यक्ष संजय जाबरे, अमोल निर्मळ, श्री. साप्ते, राजेंद्र पवार, नितेश खाडे, निलेश कदम सर्व पदाधिकारी वाडी वस्तीवर जाऊन समाज बांधवांना मार्गदर्शन करत आहेत.