खेड (प्रतिनिधी)तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदांचे आरक्षण मंगळवारी येथील तहसीलदार सुधीर सोनवणे यांनी जाहिर केले आहे. सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ११४ ग्रामपंचायतींच्या
तालुक्यातील अनुसूचित जातीसाठी निळीक व भेलसई तर अनुसूचित जमाती स्त्री साठी शिंगरी आणि अनुसूचित जाती स्त्री साठी कुळवंडी, मोरवंडे व हेदली हि गांवे आरक्षित झाली आहेत. सर्वसाधारण स्त्री साठी अलसुरे, आंबये, आवाशी, करटेल, कावळे, कासई, केळणे, कोरेगांव, खोपी, गुणदे, चिरणी, जैतापूर, तळघर, तळवट खेड, तळवटपाल, तळे, दयाळ, दिवाणखवटी, धामणंद, नांदिवली, फुरुस, भडगांव, माणी, मिर्ले, मुंबके, मुरडे, लवेल, शिवतर, संगलट, सवनस, सवणसखुर्द
, साखर, सुकदर, सुकीवली, सुसेरी, हुंबरी व होडखाड हि गावे आरक्षित झाली आहेत. सर्वसाधारणसाठी असगणी,अंजनी , आईनी (भिलारे), आष्टी, कर्जी, कळंबानीखुर्द ,काडवली, किंजळे तर्फे नातू , कुंभाड कुडोशी, कुरवळ जावळी, कोतवली, खवटी, घेरापालगड, चाकाळे, चिंचघर, चोरवणे,जामगे, तिसंगी, तुंबाड, धामणदिवी, धामणी, पोसरेबुदुक, बोरज, भोस्ते, मुसाड, मेटे, राजवेल, वरवली, वावेतर्फे नातू, वेरळ ,शिरगांव, शिवबुद्रुक , शेल्डी, सवेणी, सापिर्ली हि गांवे आरक्षित झाली आहेत, नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री साठी आंबडस, उधळेबुद्रुक, कळंबानीबुद्रुक, कशेडी, घेरारसाळगड, चिंचवली, तिसे, देवघर,भरणे, मोहाने, लोटे, वडगांव, वावेतर्फे खेड, शिरवली, सोनगाव हि गावे आरक्षित झाली आहेत. तर नागरीकांच्या मागास प्रवर्गसाठी आंबवली, आस्तान, ऐनवरे, कसबानातू, कोंडिवली, घाणेखुंट, चौघुले मोहल्ला, तुळसीखुर्द, दाभिळ, नांदगांव, पन्हाळजे, पोयनार, बहिरवली, मांडवे व शेरवल हि गावे आरक्षित झाली आहेत.










