खेड(प्रतिनिधी)औद्योगिकरणामुळे नोकरी धंदा मिळाला असला तरी पारंपरिक उन्हाळी पीक खेड तालुक्यातील लोटे पंचक्रोशीतून गायब होऊ लागली आहेत. त्याचबरोबर हापूस आंब्यासह रायवळी आंब्याच्या उत्पादनातही प्रतिवर्षी घट होऊ लागली आहे. त्यामुळे औद्योगिकरणाच्या जाळ्यात लोटे पंचक्रोशीत ना उन्हाळी पिके घेता येत ना हापूसचे उत्पादन होत, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
खेड तालुक्यातील ‘लोट्याचा माळ’ म्हणून ओळख असणाऱ्या आवाशी, असगणी, लोटे, घाणेखुंट, पीरलोटे या पंचक्रोशीत साधारणपणे चाळीस वर्षांपूर्वी औद्योगिक वसाहत कार्यान्वित झाली. सुरुवातीच्या काळात कारखान्यांची संख्या मोजकी होती. हळूहळू रासायनिक कारखान्यांची संख्या वाढली.
या कारखान्यांमुळे मोठ्च प्रमाणात रोजगार उपलब्ध झाले. मात्र, त्याचवेळ प्रदूषणाचाही मुद्दा पुढे आला रासायनिक कारखान्यांमुळे लोटे परिसरातील नैसर्गिक विहिरी नाले, ओढे, परे, तला प्रदूषित झाले आहेत त्याचबरोबर भातशेतीसह फळबागाही उद्ध्वस्त होऊ लागल्या. वाढत्य प्रदूषणामुळे येथील उन्हाळ शेतीही नष्ट झाली आहे त्यामुळे उन्हाळी पिकांच आनंद घेण्यासाठी अनेकांन खेड वा चिपळूण शहरात जाव लागत आहे.
परिसरातील झाडांवर राख आणि बुरशीजन्य पदर पाहायला मिळत आहेत त्यामुळे झाडांची फळधारण मृतावस्थेत झाली आहे. य भागातील आंबे, काजू करवंदे, बोरे, फणस, कोकम चिकू, पेरू या फळांचे उत्पादनही कमी झाले आहे या परिस्थितीमुळे येथील शेतकऱ्यांनी भातशेतीच् करणे सोडून दिले आहे.












