वेरळ मधील इमारती मधून १७ हजारांचे साहित्य चोरीस

खेड(प्रतिनिधी)
महामार्गा वरील वेरळ साईदिप अपार्टमेंट मधून अज्ञात चोरट्याने १७ हजार रुपयांचे घरगुती साहित्य चोरून नेल्याची घटना २९ मार्च रोजी सायंकाळी ४. वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली
सौ. नंदा सिताराम बोराडे वय – ५० रा. वेरळ साईदिप अपार्टमेंट, रुमनंबर १०२  या  त्यांच्या मालकीच्या  फ्लॅट च्या  दरवाजाचे लॉक  अज्ञात चोरट्याने  त्याचेकडील डुप्लीकेट चावीने खोलुन त्याव्दारे रुममध्ये अनाधिकारपणे प्रवेशकरुन
 १७, हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले   त्यात  ८ हजार , रुपये किंमतीचा सॅमसंगकंपनीचा सींगल डोअरचा फ्रीज   ३ हजार  रुपये किमतीची सुर्या कंपनीचीदोन बर्नर असलेलीकाचेची शेगडी  ६ हजार  रुपये किमतीची उषा कंपनीची शिलाई मशीन आदी साहित्य चा समावेश आहे