बंदर विभागाच्या जागेवर अवैध पार्किंग खपवून घेतले जाणार नाही

अधिकाऱ्यांवरही होणार कारवाई
अडखळ बंदराच्या भेटी दरम्यान ना. नितेश राणे यांचे स्पष्ट शब्दात सूचना

दापोली| प्रतिनिधी: 

बंदर खात्याच्या जागेवर कोणी अनधिकृतपणे गाड्या उभ्या केल्या तर त्या समुद्रात लोटायला मी स्वतः इथे येईन, शासनाच्या जागेचा वापर शासकीयच झाला पाहिजे, त्यात अधिकार्यकांकडूनही कसूर झाल्यास त्यांच्यावर थेट कारवाईच केली जाईल अशा शब्दात राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी अडखळ जेटीवर दोन गटांमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांना खडे बोल सुनावले.

b

दापोली दौऱ्यावर असणाऱ्या ना. राणे यांनी अडखळ बंदराला भेट देऊन जेटीच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अडखळ बंदर जेटीचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराची त्यांनी कान उघाडणी केली. मला खोटी माहिती देऊ नका, खोटी माहिती द्याल तर डबल फाईन करेन अशा शब्दात त्यांनी ठेकेदाराला सज्जड दम भरला. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी जेटीवर गाड्या पार्किंग केल्याने दोन गटात मोठा राडा झाला होता. या ठिकाणी गाड्यांना पार्किंग करीता परमिशन कोण देतो? ही बंदर विकास खात्याची अंतर्गत जागा आहे यावरून त्यांनी बंदरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. तुम्ही याकडे लक्ष दिले नाहीत तर तुम्हाला घरात पाठवावे लागेल अशा शब्दात मंत्री नितेश राणे यांनी बंदर विकास खात्याचे अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात निर्देश दिले. यापुढे या बंदर किनाऱ्यावर अवैधरित्या कोणी गाड्या पार्किंग केल्यास मी स्वतः येऊन या गाड्या सगळ्या समुद्रात लोटून टाकीन आणि यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असाही इशारा दिला. तर कार्यकर्त्यांनी योग्य माहिती माझ्यापर्यंत द्यावी त्यानुसार कारवाई करता येईल असेही स्पष्ट केले.

हणै॔ बंदराच्या जेटीला मार्चला पर्यावरण खात्याची मंजुरी मिळाली आहे. 205.26 कोटी रुपयांच हे काम आहे. महाराष्ट्राच्या बंदर मंत्रालयाच्या माध्यमातून हे काम वेळेत व्हावं, दर्जेदार व्हावं, आमच्या स्थानिक मच्छीमारांना रोजगार मिळावा याचा फायदा स्थानिकांना विश्वासात घेतलं जावं या दृष्टीने काम केले जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अत्यंत महत्त्वाचा असलेल्या हणै॔ बंदर जेटीच्या कामाची पाहणी केली व अधिकाऱ्यांना हे का वेळेत पूर्ण करण्याच्या व दर्जेदार करण्याच्या सूचना यावेळी ना. राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.