प्रगतशील शेतकरी महेश संसारे यांचा मातृसंस्था सन्मान पुरस्काराने गौरव

कोंकणस्थ वैश्य समाजाकडून पुरस्कार प्रदान

वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी महेश रामदास संसारे यांना मातृसंस्था सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. कोंकणस्थ (संगमेश्वरी) वैश्य समाज मुंबई यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष गणपत शेटये, चिटणीस जागृती गांगण यांच्या शुभहस्ते श्री. संसारे यांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. मातृसंस्था सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल महेश संसारे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
यापूर्वी महेश संसारे यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा कृषी पुरस्कार प्राप्त झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांची ओळख प्रगतशील शेतकरी अशी राहिली आहे. त्यांचा जन्म वैभववाडी तालुक्यातील मांगवली या गावात झाला. त्यांनी कृषी क्षेत्रात पदवी संपादन केली आहे. पंचगव्य थेरपी मधील त्यांनी मास्टर डिप्लोमा पूर्ण केला आहे. पंचगव्य म्हणजे भारतीय गायीचे दूध, मूत्र, शेण, तूप व दही यापासून त्यांनी आयुर्वेदिक तेल, औषधे बनवली आहेत. पंचगव्य थेरपीवर विशेष अभ्यास व अनुभव त्यांच्याकडे आहे. शासनाचे तसेच संस्थांचे त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, सहकार व राजकीय क्षेत्रात समाजभिमुख असे उल्लेखनीय काम केले आहे.

 

मांगवली गावचे सरपंच, वैभववाडी तालुका विक्री खरेदी विक्री संघाचे चेअरमन, प्रणव प्रोडूसर फार्मर कंपनीचे अध्यक्ष या पदावर त्यांनी चांगले काम केले आहे. वैश्य समाजाकडून त्यांना मातृसंस्था पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे . पुरस्कार प्राप्त संसार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.