ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
वैभववाडी l प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी भाजपाच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर व ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी वैभववाडी भाजप कार्यालयात नागरिकांनी गर्दी केली होती. वयोवृद्ध नागरिकांचे डोळे तपासून त्यांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे, जिल्हा बँक माजी संचालक दिगंबर पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा प्राची तावडे, उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे, नगरसेवक संजय सावंत, बांधकाम सभापती रणजीत तावडे, सरपंच प्रदीप नारकर, नगरसेवक रोहन रावराणे, तात्या पाटील, रामचंद्र बावदाणे, संतोष रावराणे, शिवाजी राणे, सुभाष रावराणे, प्रदीप रावराणे, उत्तम सुतार, प्रकाश सावंत, अतुल नारकर, रमेश शेळके, गणेश पवार, आशिष पवार, दाजी पाटणकर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













