पालकमंत्री नितेश राणे यांची ओरोस येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती
देवगड (प्रतिनिधी)
देवगड तालुक्याला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे हा आमचा मानस आहे. यासाठी विजयदुर्ग येथे जहाज बांधणी व तोडणी कारखाना हा प्रकल्प आपण आणण्याच्या तयारीत असून गुजरात येथील आलंग येथे याच प्रकारचे प्रकल्प आहेत. यामुळे सिंधुदुर्गचे अर्थकारण बदलेल थेट एक लाख व अप्रत्यक्षरीत्या ४५ हजार लोकांना यातून रोजगार मिळणार आहे.
त्याचबरोबर देवगड तालुक्याचे अर्थकरणं बदलणारा देवगड आनंदवाडी बंद जीटी प्रकल्पासाठी ८५ कोटी निधीची गरज होती त्यानुसार केंद्राच्या सागरमाला योजनेतून ८५ कोटी निधीची तरतूद केली आहे. नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत आनंदवाडी प्रकल्प पूर्ण कार्यान्वित होईल असा विश्वास मला आहे. अशी माहिती ही मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पोरस येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील ,प्रभारी पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावले, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत












