माखजन :संगमेश्वर तालुक्यातील माखजन ग्रामपंचायती तर्फे कामगार दिनाचे औचित्य साधून १५ व्या वित्तआयोगा मधून विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यामध्ये गावातील आशा सेविकांना रेकॉर्ड जतन करण्यासाठी कपाट, वजन काटा देण्यात आला.बचत गटातील महिलांसाठी पापड मशीन ,अंगणवाडी तील मुलांसाठी सतरंजी,मॅट, व इतर जेवणासाठी लागणारी भांडी,कुकर आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी सरपंच महेश बाष्टे,अन्य ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.अंगणवाडी,महिला बचत गट,आशा सेविका यांना दररोज लागणाऱ्या वस्तू ग्रामपंचायतीने दिल्यामुळे,ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त करण्यात आले.दरम्यान यावेळी महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रामपंचायत कर्मचारी नरेंद्र खातू यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.











