मंडणगड l प्रतिनिधी : उच्च माध्यमीक परिक्षेचा निकाल सोमवार 05 मे 2025 रोजी जाहीर झाला असून या परिक्षेत शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील ऋतिक घाग याने वाणिज्य शाखेत (91.33) गुण मिळवत तालुक्यात प्रथम, वैदवी पवार हिने कला शाखेत (81.83) गुण मिळवून व्दितीय तर वाणिज्य शाखेतून ऋतिक खर्सेकर (81.33) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवीला. महाविद्यालय निहाय तालुक्याचा निकाल खालील प्रमाणे
1 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कुल मंडणगड-
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेचा निकाल 86.67 टक्के लागला. परिक्षेस बसलेल्या 60 पैकी 52 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वैदवी पवार(81.83), अनुजा गरड(73.33), अक्षता पवार (71.33) यांनी अनुक्रमे पहीले तीन क्रमांक मिळवीले. वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला. परिक्षेस बसलेल्या 56 पैकी 56 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ऋतिक घाग (91.33) ऋतिक खर्सेकर (81.33) सुविधा लोखंडे (80.33) यांनी अनुक्रमे पहीले तीन क्रमांक मिळवीले. विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला परिक्षेस बसलेल्या 68 पैकी 68 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पियुष नगरकर(77.50) सृष्टी गोसावी (71.83) अक्षा यादव (67.17) यांनी अनुक्रमे पहीले तीन क्रमांक मिळवीले.
2 देव्हारे कनिष्ठ महाविद्यालय – पंचक्रोशी कनिष्ठ महाविद्यालय देव्हारे च्या कला शाखेचा निकाल 96.22 टक्के लागला. परिक्षेस बसलेल्या 53 विद्यार्थ्यांपैकी 50 विद्यार्थी पास झाले. कला शाखेत सुबोधन पवार (81.17) अजमिना सातारकर (64.67) पुजा खैरे (63.67) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळवले. तर वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला 48 पैकी 48 विद्यार्थी पास झाले. मनस्वी सावंत (69.17) सुरज रटाटे (69.17) चंदना देवघरकर (68.83) रसिदा घरवे (67.17)यांनी अनुक्रमे पहीले तीन क्रमांक मिळवीले.
3 जर्मन परकार बाणकोट- बाणकोट येथील जर्मन परकार वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा निकाल 94.7 टक्के इतका लागला. परिक्षेस बसलेले 19 पैकी 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इकरा दादरकर (81.17) रैना हमदुले (67.33) इकरा बेग (57.00) यांनी अनुक्रमे पहीले तीन क्रमांक मिळवीले.
4 कर्मवीर भि.रा. तथा दादा इदाते वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मंडणगड- या विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला. परिक्षेस बसलेल्या 21 विद्यार्थ्यापैकी 21 उत्तीर्ण झाले. नेहा बामणे (64.50) श्रद्धा मोडकले (58.83) रोहन नलावडे (57.50) यांनी प्रथम तीन क्रमांक मिळवीले. महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा निकाल 97.62 टक्के लागला. परिक्षेस 42 विद्यार्थ्यांपैकी 41 विद्यार्थी पास झाले. मेघना यादव (78.33) सिध्दी दिवेकर(77.00) अनिशा कदम (76.83) यांनी प्रथम तीन क्रमांक मिळवीले.
5 कुंबळे महाविद्यालय – कुंबळे कर्मवीर भि.रा.तथा दादा इदाते कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेचा निकाल 90.90 टक्के लागला परिक्षेस प्रविष्ठ 33 विद्यार्थ्यापैकी 30 पास झाले. शहब तांबे (77.17) सानीका शिगवण (74.83) आदीत्य गोठल (62.00) यांनी प्रथम तीन क्रमांक मिळवीले. वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला परिक्षेस बसलेले 20 विद्यार्थी बसले होते 20 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. श्रृती लोखंडे (68.17) श्रध्दा पवार (65.83) मंजु चव्हाण(65.67) यांनी प्रथम तीन क्रमांक मिळवीले.
6 औद्योगीक प्रशिक्षण संस्था
शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचा निकाल शंभर टक्के लागला टेक्नीकल सायंन्सचे परिक्षेत दोन विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले.











