लोटेमध्ये प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

खेड(प्रतिनिधी)खेड तालुक्यातील लोटेमाळ  माळवाडी येथे एका ६५ वर्षीय प्रौढाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ४ मे रोजी सकाळी १०.३० वा. च्या सुमारास उघडकीस आली.
सुधाकर बाबू वासकर रा लोटेमाळ माळवाडी मूळ गाव टेरव  सुतार वाडी ता चिपळूण असे त्या आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. उपलब्ध माहिती नुसार  मयत हा लोटे एमआयडीसी येथे सिक्युरीटी गार्ड म्हणुन नोकरी करत होता व भाड्याचे खोलीत राहत असे तसेच मयत यास दारुचे व्यसन होते.  मयत हा एकटाच घरी असताना खोलीचे छताला असलेले लाकडी भालाला नायलॉन साडीने बांधुन गळफास घेतले स्थितीत मिळुन आला. या प्रकरणी पोलिसानी आकस्मिक मृत्यू ची नोंद केली आहे