रत्नागिरी : प्रतिनिधी
गोविळ (ता. लांजा) येथील प्रौढ आंब्याच्या कलमावर चढला असता फांदी तूटल्यामुळे खाली पडला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सुहास गंगाराम लाखण ( ५१, रा. गोवीळ, ता. लांजा) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ५) सकाळी साडेआठच्या सुमारास गोवीळ येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुहास लाखण हे सकाळी आंबा कलमाच्या झाडावर आंबे काढत असताना हातात धरलेली फांदी अचानक तुटली आणि ते पंधरा फुट खाली पडले. त्यांच्या छातीला मुका मार लागला. तात्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या पोलिस चौकीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.












