मुख्यमंत्री तीर्थ दर्शन आयोध्या यात्रेत मंडणगड तालुक्यातील जेष्ठांचा सहभाग

मंडणगड l प्रतिनिधी – मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील साठ वर्षांपुढील जेष्ठ नागरिकांसाठी 26 एप्रिल ते 1 मे 2025 या पाच दिवसांचे राम जन्मभूमी अयोध्या यात्रा आयोजित केली होती. या योजनेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यातून जवळजवळ आठशे पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते मंडणगड तालुक्यातील जेष्ठ नागरीकही या यात्रेत सहभागी झाले होते. 26 एप्रिल 2025 रोजी रत्नागिरी येथून रेल्वेने हा प्रवास सुरू झाला. मंडणगड – दापोली – खेड येथील नागरिक खेड रेल्वे स्टेशन येथे यात्रेत सहभागी झाले. गृह राज्य मंत्री योगेश कदम यांनी या प्रवासात लागणाऱ्या वस्तूंचे किट जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पुरविले व त्यांचा प्रवास सुखकर होईल अशी काळजी घेतली. मंत्री महोदय यांनी ऑनलाइन प्रणाली द्वारे प्रवासासाठी सर्व ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा दिल्या. प्रवास चालू झाला जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागराकांनी जय श्रीराम नामघोष करत भजन कीर्तन गाणी म्हणत प्रवासाचा आनंद घेतला. या प्रवासात सर्व ज्येष्ठ नागरिकांची योग्य ती काळजी घेण्याचे काम रत्नागिरी जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत अतिशय सुंदर आणि नियोजनपूर्वक करण्यात आले होते. समाज कल्याण विभागाचे प्रमुख आणि त्यांची सर्व टीम व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय सानप आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिला परिचारिका यांचेही या सर्वांचे प्रावासी ज्येष्ठ नागरिकांनी आभार व्यक्त केले. या सर्वांनी ही यात्रा ज्येष्ठ नागरिकांची योग्य ती काळजी घेऊन यात्रा यशस्वीपणे पार पाडली. दीपक घाटे, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक जाधव, विजया मोरे, रितेश सोनवणे, महेश्वरी विचारे यांनी विशेष मेहनत घेतली. मंडणगड तालुका ज्येष्ठ नागरिक सहाय्यक श्री. अमित चिले यांनी यात्रेत सहभागी तालुक्यातील जेष्ठ नागरीकांचेवतीने आयोजकांचे आभार मानले आहेत.