भारताने पाकिस्तानला मुहतोड जबाब दिला

भारताने पाकिस्तानला मुहतोड जबाब दिला

खासदार नारायण राणे यांचे प्रतिपादन

कणकवलीत भाजपकडून एअर सर्जिकल स्ट्राईक जल्लोष

कणकवली : भारतीय सैन्याने पाक व्याप्त कश्मिरमध्ये घुसून आॅपरेशन सिंदूर अंतर्गत सर्जिकल एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त केले. भारताने पाकिस्तानला धडा शिकवला. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचलेले पाऊलाचा देशवासीयांना सार्थ अभिमान आहे. सर्जिकल स्ट्राईक करून भारताने पाकिस्तानला मुहतोड जबाब दिला आहे. पाकिस्तानला भारताने चोख प्रत्युत्तर दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन करतो. भारत सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय सैन्याच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल जल्लोष भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गाव, तालुका, जिल्हास्तरावर साजरा करावा, असे आवाहन खासदार नारायण राणे यांनी केले.

पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून भारतीय सैन्याने बुधवारी मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सर्जिकल एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त करून त्यांना ठार मारले. या अभिमानास्पद कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय सैन्याचे अभिनंदन करण्यासाठी येथील प्रहार भवन येथे सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पक्षातर्फे कार्यक्रम आयोजित केला. याप्रसंगी खा. राणे बोलत होते.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जि.प.अध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, माजी सभापती मनोज रावराणे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, लखम राजे भोसले, डॉ. मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

खा. नारायण राणे म्हणाले, जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेने भारत सुन्न झाला होता. या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने बुधवारी मध्यरात्री पाक व्याप्त कश्मिरमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दशतवाद्यांची स्थळे उद्ध्वस्त केली. पाक पुरस्कृत दशतवादाला मुहतोड जबाब दिला. याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन केले.

पाकिस्तानला शिकवलेल्या धडाबद्दल मला सार्थ अभिमान आहे. पाक पुरस्कृत दहशवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला भारतीय सैन्य दलाने चोख प्रत्युत्तर दिले आहे, ही बाब देशावीसायांसाठी गर्वाची आणि अभिमानाची आहे. राष्ट्रहितासाठी भूमिका घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या भारतीय सैन्य दलाचा पाठिशी देशवासीयांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे राणेंनी सांगितले.

पाकव्याप काश्मिरमध्ये भारतीय सैन्य दलाने एअर स्ट्राईक दहशतवाद्यांचे स्थळे उद्ध्वस्त करून दहशतवादाचा बीमोड केला. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह अन्य सहकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचा देशवासीयांना सार्थ अभिमान आहे. सर्जिकल एअर स्ट्राईकची कृती छोटीसा नाही. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांना योग्य संदेश मिळला आहे. एअर स्ट्राईक क्षण देशवासीयांची छाती अभिमानाने भरून आणणार आहे. देश आणि देशवासीयांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकार कोणतीही तडजोड करीत आहे, हे या स्ट्राईकने दाखवून दिले आहे. भारतीय सैन्याने केलेल्या स्ट्राईक बद्दल मी सकाळी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन केले. देशाच्या सुरक्षिततेबाबत केंद्र सरकारने दाखवलेली तप्तरतामुळे देशवासीयांची आता जाबबदारी वाढली आहे. देशावर यापुढील काळात कोणतेही संकट ओढवले तर त्या संकटाचा सामना सर्वांनी मिळून केला पाहिजे. यापुढील काळात सर्वांनी राष्टÑहिताच्या कार्यात केंद्र सरकारला आपला खंबीर पाठिंबा द्यावा, असे आवाहन राणेंनी केले.

प्रभाकर सावंत म्हणाले, पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाक व्याप्त काश्मिरमध्ये घुसून सर्जिकल एअर स्ट्राईक करून दहशतववाद्यांची स्थळे उद्ध्वस्त केली. भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवादाविरोधात भारताने घेतलेल्या भूमिकेला तुर्कस्थान व चीन वगळता सर्वच देशांनी आपला पाठिंबा दर्शवला. भारतीय सैन्य दलाने एअर स्ट्राईक करून पाकिस्तानातील दहशतवादाचा एकप्रकारे बीमोड केला, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे देशहितासाठी कठोर निर्णय घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंशी देशवासीयांनी खंबीरपणे उभे रहावे. या एअर स्ट्राईकचे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावोगावी जल्लोष साजरा करावा, असे आवाहन सावंत यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाला माजी जि.प. अध्यक्ष संजना सावंत यांच्या भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भारत माता की जय, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय सैन्य दलाचा विजय असो, वंदे मातरम् अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली.