कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांना बंधू शोक | सचिन नलावडे यांचे निधन

कणकवली : शहराचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे बंधू सचिन अनंत नलावडे ( वय – ४९ रा. कणकवली ) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांची प्रकृती अस्वस्थमुळे त्यांना पडवे येथील लाईफटाईम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड होत गेल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

 

सचिन यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, भावजय, मुलगा, पुतणे, तीन विवाहित बहिणी, असा मोठा परिवार आहे.

 

सचिन नलावडे हे कणकवली शहरात मनमिळाऊ व हसतमुख व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. आपल्या विनोदी स्वभावामुळे देखील त्यानी अनेकांशी स्नेहाचे संबंध निर्माण केले होते. त्यांच्यावर आज कणकवलीतील मराठा मंडळ नजीकच्या स्मशानभूमीत दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.