महादेवाचे केरवडे येथे १९ मे रोजी जिल्हास्तरीय खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन 

कुडाळ : महादेवाचे केरवडे येथील प्रसिद्ध श्री सिद्ध महादेव मंदिर यात्रेनिमित्त शिवतेज ग्रुप महादेवाचे केरवडे यांच्यामार्फत सोमवार, दिनांक १९ मे २०२५ रोजी जिल्हास्तरीय खुल्या एकेरी रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन गटांमध्ये होणार आहे: जिल्हास्तरीय खुला गट आणि माणगाव खोरे मर्यादित खुला गट.

जिल्हास्तरीय खुल्या गटातील विजेत्यांना अनुक्रमे ५०००₹ व ट्रॉफी, ३०००₹ व ट्रॉफी आणि २०००₹ व ट्रॉफी अशी पारितोषिके दिली जातील. तर, माणगाव खोरे मर्यादित खुल्या गटातील विजेत्यांना २०००₹ व ट्रॉफी, १५००₹ व ट्रॉफी आणि १०००₹ व ट्रॉफी देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

ही स्पर्धा श्री सिद्ध महादेव मंदिर, महादेवाचे केरवडे येथे सोमवार, दिनांक १९ मे २०२५ रोजी रात्री ठीक ७.०० वाजता सुरू होईल. स्पर्धेत प्रवेश विनामूल्य असून, इच्छुक स्पर्धकांनी १७ मे २०२५ पूर्वी आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेचा निकाल त्याच दिवशी बक्षीस वितरणानंतर जाहीर केला जाईल.

नोंदणी आणि अधिक माहितीसाठी गणेश नाईक (९८६०२५२८२५, ९४२२२६३८०२) आणि सुहास सावंत (९४२०८८८८१३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवतेज ग्रुपने केले आहे.