ओटवणे शेरवाळवाडी येथील ब्राह्मण मंदिर वार्षिक उत्सव 10 मे रोजी.

ओटवणे (प्रतिनिधी ) दरवर्षी प्रमाणे ओटवणे शेरवाळवाडी येथीलश्री. ब्राह्मण मंदिर या जागृत देवस्थानचा वार्षिक उत्सव शनिवार 10 मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमानी संपन्न होत आहे. या निमित्त सकाळी 9 वा. गणेश पूजन व अभिषेक, 11 वा. सत्यनारायण महापूजा,12 वा. महाआरती,दु. 1.30 वा. महाप्रसाद,4.30 ते 6.30 ग्रामस्थांची भजने,6.30 ते 9 महिला लहान मुले यांचे सांस्कृतिक गुणदर्शनपर कार्यक्रम तर तर 9 वा. विघ्नहर्था रामेश्वर द. नाट्य मंडळ निगुडे रानेवाडी यांचा दशावतार नाट्य प्रयोग सादर होणार आहे या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शेष साक्षात्कार सेवा समिती आणि शेरवाळवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.