For me, no one is bigger than the people, pay the public first, give service

आमदार नितेश राणे यांचे “शासन आपल्या दारी” कार्यक्रमात अधिकारी कर्मचाऱ्यांना आवाहन
कणकवलीत मिळाला शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ
आमदार नितेश राणे यांनी अधिकारी- कर्मचाऱ्यांचे केले अभिनंदन..!
शासन आपल्या दारी व कृषी प्रदर्शनाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले उद्घाटन
संतोष राऊळ ( कणकवली ) कणकवली देवगड वैभववाडी येथील जनतेमुळे मी दोनवेळा राज्याच्या विधिमंडळात आमदार म्हणून गेलो.आज आमदार म्हणून अधिवेशनात प्रश्न मांडतो तेव्हा जनतेची आठवण येते. माझ्या साठी जनतेपेक्षा कोणी मोठा नाहीं. मी जो आहे तो जनतेसाठीच. जे काम करायचे ते जनतेच्या विकासाचे. जनतेचे संकट ते माझे संकट.त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याला महत्त्व द्या. त्यांच्या तक्रारी येता नयेत,त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे समाधान झाले पाहिजे.अशा पद्धतीने काम करा.याच कामातून खऱ्या अर्थाने शासन आपल्या दारापर्यंत पोचल्याचे समाधान मिळेल. असे प्रतिपादन भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथे केले.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट जनतेला उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने शासन आपल्या दारी व तालुका कृषी विभागाच्या वतीने कृषी प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांत अधिकारी जगदीश कातकर,तहसीलदार रमेश पवार,माजी सभापती मनोज रावराणे, कृषी उत्पन्नबाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे,गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, माजी उप नगराध्यक्ष बंडू हर्णे,माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम,बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पाटील, तालुका कृषी अधिकारी वैशाली मुळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रणोती इंगवले, कृषी अधिकारी सुभाष पवार, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एम. एन. चौगुले, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, विस्तार अधिकारी सुर्यकांत वारंग, नगरपंचायत मुख्याधिकारी अवधूत तावडे आदी उपस्थित होते.
आमदार नितेश राणे म्हणाले,
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले पाहिजे कारण त्यांनी शासन आपल्या दारी असा महत्वाचा उपक्रम हाती घेतला.ज्याचा फायदा थेट लोकांना होत आहे.
योजना लाभार्थी पर्यंत पोचते आहे.त्यामुळे जे समाधान जनतेच्या चऱ्यावर पाहायला मिळते त्यातून आपण सेवक आहोत याची पुन्हा पुन्हा जाणीव होते.
आमदार नितेश राणे म्हणाले,कणकवलीचा शासन आपल्या दारी कार्यक्रम कमी वेळेत यशस्वी केल्या बद्दल प्रांत अधिकारी,तहसीलदार,गटविकास अधिकारी आणि इतर खात्याचे अधिकारी यांचे अभिनंदन केले पाहिजे.मात्र हा कार्यक्रम एका दिवसा साठी असू नये. जनतेला ३६५ दिवस शासन आपल्या दारी आहे अशी सेवा द्या.असे आवाहन केले.
जनतेचे प्रश्न आहेत.ते तुमच्या स्थरावर सोडवा. जेव्हा आमच्या कडे तुमच्या तक्रारी येतात तेव्हा आम्ही फोन करून चिडतो. याला कारण आम्हाला जनता,त्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत.जनतेचे समाधान हेच आमचे समाधान आहे.त्यामुळे त्यांचे प्रश्न सोडवा आम्ही समाधानी होवू असे आमदार राणे यांनी सांगितले.
प्रांताधिकारी जगदीश कातकर म्हणाले,
माजी मुख्यमंत्री नारायण राणे जेव्हा राज्याचे महसूल मंत्री आणि पालकमंत्री होते तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासन आपल्या दारी योजना सुरू केली होती. आज त्यांच्याच कार्याची आणि योजनांची पुनरावृत्ती होत आहे. असे उपक्रम सातत्यपूर्ण घेतले जावे आणि तशा आपण ते घेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक तहसीलदार आर.जे. पवार यांनी केले.











