डॉक्टर ही मला मिळालेली पदवी हा माझ्या गावाचा सन्मान : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

तळवडे येथे पितांबरीकार रविंद्र प्रभुदेसाई यांचा नागरी सत्कार

पाचल (वार्ताहर): डॉक्टर या पदवीमागे दडलेला विचार हा उदयोगासाठी खूप महत्वाचा आहे. पितांबरी उदयोगाला पाठबळ देणाऱ्या माझे कुटुंब, कर्मचारी व माझे ग्रामस्थ यांचा हा सन्मान आहे. त्यामुळे मला मिळालेली डॉक्टर ही पदवी या सर्वाना मनःपूर्वक अर्पण करतो, असे भावोद्गार डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांनी काढले.

टिळक महाराष्ट्र विदयापीठ पुणे यांच्यावतीने पितांबरी उदयोग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांना उदयोग क्षेत्रातील कर्तृत्व आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदाना बदल नुकतीच डी लीट पदवी प्रदान करण्यात आली होती. त्यानिमित्व तळवडे ग्रामपंचाय आणि राजापुर-लांजा नागरीक संघाच्या वतीने प्रभुदेसाई यांच्या नागरी सत्काराचे आयोजन राजापूर तालुक्यातील तळवडे येथे करण्यात आले होते. व्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळवडे सरपंच सौ. गायत्री साळवी होत्या.

भारतातातील अग्रगण्य उदयोगामध्ये पितांबरीचे नाव आदराने नाव घेतले जाते. व्यांचा उदयोग भारताच्या कानाकोपऱ्यात असून परदेशात २६ देशामध्ये व्यापून राहिला आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या आपल्या मायभूमीवर नितांत प्रेम करणारे पितांबरीकार रवींद्र प्रभुदेसाई हे तळवडे गावचे सुपूत्र आहेत. त्यामुळे त्यांना डॉक्टर ही प्राप्त झाल्याबदयल ग्रामस्थांनी त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ गोमातेची पूजन करून करण्यात आला. त्यानंतर महिलांनी व्यांचे औक्षण करून, फुलांची पुष्पवृष्टी करत व्यासपीठावर नेण्यात आले..

यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उदयोग समूहाचे मुख्य कायकारी अधिकारी महादेव पुजारी, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोदयोग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, राजापुर-लांजा नागरीक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, सरपंच सौ. गायत्री साळवी, उपसरपंच यशवंत साळवी, नव्वदी पार केलेले बुर्जुग व्यक्तीमत्व असलेले सेवानिवृत्त शिक्षक सखाराम साळवी, रंगनाथ सप्रे, नागरी सत्कार समितचे प्रमुख आप्पा साळवी आदि प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी पितांबरीकार रवींद्र प्रभुदेसाई यांचा सखाराम साळवी, रंगनाथ सप्रे यांच्या हस्ते व मान्यावरांच्या उपस्थित मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रवींद्र साठे, सुभाष लाड यांनी प्रभुदेसाई यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला सामाजिक, शैक्षणिक, राजकिय तसेच उदयोग क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडली मोठ्या संख्येने उपस्थित होते.