मे महिन्याच्या पहील्या आठवड्यात पावसाची हजेरी अवकाळी पाऊस आंबा, काजू पीक धोक्यात; शेतकरी चिंतातुर

मंडणगड | प्रतिनिधी :  मे महिन्याच्या पहील्या आठवड्यात कडक उन्हाच्या लाही लाहीने नागरिक त्रस्त असताना तीन दिवसापासून पावसाने तालुक्यात हजेरी लावली आहे. सायंकाळी ढग दाटून पावसाचे वातावरण तयार होवून अंधार पडता पडता पाच मिनिटांकरिता वीजा चमकून तुरळक पाऊस बरसतो (9) रोजी सकाळी दहा वाजल्यापासून वातावरणात बदल होऊन पावसाची सुरुवात झाली. आंबा, काजू हंगाम तयार फळे झाडांवरुन खाली उतरिवण्याचे कालावधीत आला आहे शेतकऱ्यांची लगबग फळे काढण्यासाठी सुरु आहे. अवकाळी पावसाने आंब्याच्या दर कमी होण्याची भितीने शेतकरी चिंतातुर झाला आहे. यंदाच्या हंगामात झालेला आंबा बागायदार शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हापूस पिकावर तालुक्याचे आर्थकारण मोठ्या प्रमाणावर चालते, याकरिता वर्षभर मेहनत करणारे शेतकरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांच्या वार्षिक उत्पन्नावर याचा फार मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. उन्हामुळे त्रस्त झालेले नागरिकांना काही अंशी का होईना उष्णतेपासून दिलासा मिळाला.

 

 

तापलेल्या उन्हाने उष्णतेचे सर्व विक्रम यंदा मागे टाकत सर्वाधिक तापमानाची नोंद झाली पाऊस लवकर येण्याचे अंदाज असताना मे महिन्याच्या पहील्या आठवड्यात पावसाची हजेरी विविध समस्यांचे कारण ठरली आहे कारण बांधकाम हंगाम अंतीम टप्यात असल्याने घराचे कामे पुर्ण करण्यासाठी सगळ्यांचीच धावपळ सुरु आहे, सायंकाळच्या सुमारास वातावरणात ढग दाटून येवून अचानक बदल होणे मध्यरात्री विजांचा लखलखाट करीत पावसाची हजेरी त्यामुळे रस्ते भिजून गेले व घरांच्या पागोळ्या वाहून गेल्या. मात्र हापूस आंबा हातात आलेला असताना तालुक्यात पावसाने अचानक लावलेली हजेरी यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत