दापोली | प्रतिनिधी:- दापोली तालुक्यातील लाडघर समुद्रात मोठा बार्ज उभा असून तो नक्की कशाचा आहे आणि पहेलगाम चा झालेला हल्ला;सुरू असलेला भारत पाकिस्तानचे द्वंद्व या पार्श्वभूमीवर शंकांचे मेसेज सोशल मीडिया त्याचप्रमाणे काही बातमीपत्रांतून येत होते या संदर्भात दापोली तहसीलदार अर्चना बोंबे यांनी माहिती देताना सांगितलं,नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नसून त्याची पडताळणी झाली आहे आणि सदर बार्ज म्हणजे…”बॉम्बे हाय वरून निघालेली तेलाची रीग आहे.
रत्नागिरी येथील आंग्रेपोर्ट कडे ते चालले आहे. लाडघर समुद्रकिनाऱ्यावरून आंग्रेपोर्ट जाताना मात्र ग्रामस्थांना हे नेमकं कसले जहाज आहे याची उत्सुकता लागून राहिली होती.यासंदर्भात कस्टम विभागातील सूत्रांनी माहिती दिली आहे.त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भिती मनात बाळगू नये आणि कोणत्याही गोष्टीची खात्री केल्याशिवायआणि अधिकृत आस्थापनेकडून माहिती मिळाल्याशिवाय कोणतीही माहिती फॉरवर्ड करू नये.अशा सूचना दापोली तहसीलदार यांनी केल्या आहेत .












