दापोली बसस्थानकाचे रायगडच्या पथकाकडून सर्वेक्षण

दापोली l प्रतिनिधी- हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ बसस्थानक अंतर्गत रायगड विभागाच्या सर्वेक्षण पथकाने दापोली, हर्णै दाभोळ या बसस्थानकाचे परीक्षण केले.

एसटी महामंडळाची राज्यभरातील बसस्थानके ही स्वच्छ व सुंदर असावीत या उद्देशाने माजी परिवहन मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ बसस्थानक मोहिमेची सुरूवात करण्यात आली. ठराविक कालावधीनंतर विविध विभागातील पथकांनी राज्यभरातील बसस्थानकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले. यातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आगाराला रोख रकमेचे बक्षिस देखील देण्यात येणार आहे.

दापोली येथे दि. 9 मे रोजी दापोली बसस्थानक, हर्णै व दाभोळ येथील बसस्थानक यांचे सर्वेक्षण रायगड विभागाच्या विभागीय वाहतूक अधिक्षक मनिषा पाटील व विभागीय अधिकारी श्री. कांबळे, पत्रकार रूपेश वाईकर, प्रवासी प्रतिनिधी शैलेंद्र केळकर यांच्या पथकाने केले. यावेळी दापोलीचे आगारप्रमुख राजेंद्र उबाळे, कार्यशाळा अधिक्षक मुनाफ राजापकर, वाहतूक नियंत्रक हर्षल नाफडे, प्रशासकीय कर्मचारी प्रणव रेळेकर, एसटी प्रेमी विकास गुरव आदी उपस्थित होते.