खेड सुसेरी मध्ये वडिलांवर ऍसिड टाकून जखमी करणाऱ्या मुलावर गुन्हा

खेड(प्रतिनिधी)कौटुंबिक कारणातून शिवीगाळ करून अंगावर ऍसिड टाकून जखमी करणाऱ्या मुलावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना

५ मे रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सुसेरी न २ खालची येथे हा प्रकार घडला होता ५ दिवसांनी या घटनेची नोंद करण्यात आली आहे

 

 

मंगेश अनिल देवळेकर वय -२३ असे त्या गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे तर अनिल हिरु देवळेकर

असे जखमी झालेल्या वडिलांचे नाव आहे त्यांनी दिलेल्या तक्रारी नुसार फिर्यादी हे घरामध्ये असताना त्यांचा मुलगा मंगेश अनिल देवळेकर याने शिवीगाळ करुन त्यांचे अंगावर व चेह-याावर अॅसिड टाकुन डोळयावर, ओठावर, पाठिवर दुखापती केलेल्या आहेत. तरी फिर्यादी यांनी झाले दुखापतीवर उपचार घेवुन उशीराने तक्रार दाखल केल्याचे तक्रारी मध्ये म्हटले आहे