साई भंडारा आणि विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
चिपळूण (वार्ताहर) : श्री साईधाम मित्र मंडळ खुर्द मुंढर आडवाडी यांच्या वतीने मंगळवार दिनांक १३ ते १४ मे रोजी श्री साईबाबा मंदिराचा १६ वा वर्धापन दिन सोहळा आणि साई भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक होणार आहेत.
मंगळवार दिनांक १३ मे रोजी दुपारी २ वाजता साईंच्या पालखीची मिरवणूक होईल. साईबाबा मंदिर ते श्री क्षेत्रफळ देवस्थान ते वरचीवाडी अशा मार्गाने साईंच्या पालखीची मिरवणूक होणार आहे. त्यानंतर बुधवार दिनांक १४ मे रोजी सकाळी ७ वाजता अभिषेक, सकाळी आठ ते ११ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, सकाळी ११ वाजता महाआरती, दुपारी १२ ते २ वाजता महाप्रसाद, दुपारी ३ ते ४ वाजता हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ४ वाजता कीर्तन, सायंकाळी ६ वाजता सुस्वर संगीत भजन, रात्री ७ वाजता दिंडी, रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री १० वाजता सत्कार सोहळा व बक्षीस वितरण कार्यक्रम आणि रात्री ११ वाजता श्री मानाई काळेश्री नाट्य नमन मंडळ गोंधळे सतीचीवाडी यांचा बहुरंगी नमनाचा कार्यक्रम होईल. या साई भंडाऱ्याला सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री साईधाम मित्र मंडळ ग्रामस्थ व महिला मंडळ खुर्द मुंढर आडवाडी यांच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.










