चिपळूणमध्ये सर्व धर्म समभावाचे दर्शन

 शौकत मुकादम यांचे केले गणेश भक्त व पोलीसांनी कौतुक

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूणमध्ये गेले सात दिवस चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम हे रोज नागरीक सुविधा केंद्राला भेटी देवून मुंबईतील चाकरमानी व स्थानिक नागरीकांच्या अडीअडचणी समजुण घेत होते. व त्याच्यावर मार्गही काढत होते. मंगळवारी विसर्जनच्या दिवशी बहादुरशेख नाका, कळंबस्ते नाका व आजुबाजुच्या परिसरातील गर्दी न होता वेगवेगळ्या ठिकाणी गणपती आरत्या व विसर्जन व्यवस्थित व्हावे याकरिता मुकादम व त्यांचे सहकारी प्रयत्न करीत होते.
यामध्ये कळंबस्तचे सरपंच विकास गमरे, उपसरपंच गजानन महाडिक, माजी उपसरपंच विवेक महाडिक, तंटामुक्त अध्यक्ष विजय जाधव, सुरेश चिपळूणकर, संतोष जाधव, संजय चिपळूणकर अशा अनेक मान्यवरांचा समावेश होता. चिपळूण पोलीस खात्यानेही अतिशय नियोजनबद वाहतुक व विसर्जनच्या दिवशी उत्तम कामगीरी बजावल्याबद्दल त्यांचे देखील गणेश भक्ताने अभिनंदन केले आहे. मुंबईवरुन गणपती सणानिमित्त आलेले चाकरमानी मंगळवार संध्याकाळपासून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहेत. यामुळे चिपळूण रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी होत आहे. अशा प्रवाशांना रेल्वे तिकीटाचे फार्म भरुन देणे व काही अडचणी निर्माण झाल्यास त्यांना सहकार्य करणे अशा पद्धतीचे सहाय्य शौकत मुकादम व कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे सदस्य करीत आहेत.