सासोली येथील अदिती सावंत हिचे निधन 

दोडामार्ग :-    तालुक्यातिल सासोली हेदुस येथील अदिती आनंद सावंत ( 26 ) या युवतीचे रविवारी मुंबई येथे अल्पशा आजराने निधन झाले. तिच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे

अदिती ने दोडामार्ग येथे शिक्षण घेतल्यावर मुंबई येथे कामाला गेली होती. आपल्या पायावर उभी राहून आपलं आयुष्य जगायच अस तीच स्वप्न होत मात्र तीच्या अचानक जाण्याने तीच स्वप्न अपुरेच राहील आहे. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण काका काकी असा परिवार आहे. दुःख निधन झाल्याने सासोली गावात हळहळ व्यक्त होत आहे.