श्रावणी शिंदे ९५.२० टक्के गुण मिळवून प्रथम
चिपळूण (वार्ताहर) : मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दलवाई हायस्कूलचा दहावी परिक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. श्रावणी राजेंद्र शिंदे हिने (९५.२०) टक्के गुण प्राप्त करुन विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला.
कु. आर्या मंगेश भुवड हिने (९३) व्दितीय क्रमांक, कु. आयुर विजय करंजकर याने ९२.८० टक्के गुण प्राप्त करुन तृतीय क्रमांक तसेच कु. सई विहार पवार हिने ९२.२० टक्के हिने चतुर्थ क्रमांक व कुमारी मुग्धा मंगेश मोरे हिने ९१.२० टक्के गुण प्राप्त करुन पाचवा क्रमांक प्राप्त केला. शालान्त प्रमाणपत्र परीक्षेस विद्यालयातील एकूण ८० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ४५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले. २८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून ७ विद्यार्थी व्दितीय श्रेणी उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष हुसेन दलवाई, सिराज दलवाई, काँग्रेस प्रकाश खेडेकर, दाऊद दलवाई, संस्था सल्लागार शमा दलवाई, संस्था चेअरमन खलील दलवाई, व्हा. चेअरमन विलास सावंत, सचिव जहिर दलवाई, सहसचिव राजेश जाधव, खजिनदार रामचंद्र महाडिक, स्कूल कमिटी चेअरमन खालिद दलवाई, संस्था संचालक मंगेश चव्हाण, मोहन फागे, सौ. दिलशाद दलवाई, जमील दलवाई, संजय पवार विश्वस्त सुभाष नलावडे,. अशोक नलावडे, महम्मद हुसेन उमर मुसा, हिशोब परीक्षण लियाकत दलवाई तसेच मुख्याध्यापक रोहित जाधव, सर्व शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.












