मुंबई गोवा महामार्गावर खोपी फाटा येथे अपघात

 खेड(प्रतिनिधी)
 मुंबई गोवा महामार्गावर  खोपी फाटा येथे रेल्वे ट्रॅकवर असलेल्या पुलावर बुधवारी  दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास टँकर आणि ट्रक यांच्यामध्ये समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाला.  या अपघातात ट्रकचा चालक ट्रकच्या केबिनमध्येच अडकून राहिल्यामुळे त्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केले.  सांयकाळी उशीरा पर्यत महामार्गावर वाहतूक कोंडी कायम राहून एकेरी वाहतूक सुरू होती यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा कायम होत्या.
दरम्यान या अपघातात दोन्ही वाहने समोरासमोर धडकल्यामुळे दोन्ही वाहने एकमेकांमध्ये अडकून राहिली.  परिणामी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली. अपघाताची माहिती मिळताच अपघातस्थळी खेड पोलिसांनी धाव घेतली आणि वाहने हटवण्यासाठी आणि वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. या अपघातात ट्रकचालक आणि टँकर चालक दोघेही गंभीर जखमी झाले असल्याची माहिती उपस्थितानी दिली.