Bolero and two-wheeler accident at Hatkhamba; A case has been registered against one
रत्नागिरी | प्रतिनिधी : बेदरकारपणे बोलेरो पिकअप गाडी चालवून दुचाकी धडक देत अपघात केला.याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताची ही घटना 29 एप्रिल रोजी रात्री 9 वा.हातखंबा ते रत्नागिरी जाणार्या रस्त्यावरील महालक्ष्मी मंदिरापूढे घडली आहे. याबाबत अपघातातील जखमी दुचाकी चालक विजय लक्ष्मण धनावडे (30,रा.करबुडे धनावडेवाडी,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.त्यानूसार,शनिवार 29 एप्रिल रोजी रात्री 9 वा.विजय धनावडे आपल्या ताब्यातील होंडा शाईन दुचाकी (एमएच-08-एडब्ल्यू-3011) घेउन रत्नागिरी ते हातखंबा असे जात होते.त्याच सुमारास बोलेरो पिकअप (एमएच-09-ईएम-2225) वरील अज्ञात चालक भरधाव वेगाने समोरुन येत होता.त्याचा बोलेरो वरील ताबा सूटल्याने त्याने रस्त्याच्या विरुध्द बाजुला येत विजय धनावडे यांच्या दुचाकीला उजव्या बाजुला जोरात ठोकर दिली.त्यामुळे त्यांची दुचाकी पुढे फरफटत जाउन त्यांना दुखापत झाली.अपघात झाल्यानंतर बोलेरो चालकाने पळ काढलेला असून अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.









