बाथरूमची कडी बदलली म्हणून प्रौढासह पत्नीस बेदम मारहाण व विनयभंग

चार जणांवर गुन्हा; आंबडस बौद्धवाडी मधील घटना

खेड(प्रतिनिधी)

वडिलोपार्जित सामायिक घरामधील वैयक्तिक खोलीमधील बाथरूमची कडी दुरुस्त करून लावल्याच्या रागातून चार जणांनी ४९ वर्षीय प्रौढास व त्यांच्या ४५ वर्षीय पत्नीस बेदम मारहाण करून विनयभंग केल्या प्रकरणी ४ जणांवर खेड येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना ११ मे रोजी रात्रौ ११.३० वाजण्याच्या सुमारास
आंबडस बौद्धवाडी येथे घडली
या प्रकरणी सीमा उमेश चंपलोन रा. वरळी मुंबई यांनी तक्रार दाखल केली असून या प्रकरणी रमेश काशीराम हळदे, विजय काशीराम हळदे,रंजन रमेश हळदे,प्रफुल्ल महेंद्र साळुंखे सर्व रा. आंबडस बौद्ध वाडी अशी त्या गुन्हा दाखल झालेल्या चार जणांची नावे आहेत

११ मे रोजी रात्री ११ ३० वा च्या सुमारास उमेश चंपलोन यांनी बाथरूमची कडी बदलली म्हणून रमेश हळदे यांनी बाथरूम ची कडी का बदलली ?? बदलताना आम्हाला विचारले का ? असा जाब विचारला त्यावर वैयक्तिक माझी बाथरूम आहे विचारणाचा विषय येतो कुठे आणि फक्त कडी बदलली असे उत्तर दिल्याने रमेश हळदे यास राग येऊन त्याने उमेश चंपलोन यास बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर विजय काशिराम हळदे,प्रफुल्ल महेंद्र साळुंखे यांनी देखील मारहाण करत घराच्या खिडकीच्या काचा फोडून घरातील साहित्याची तोडफोड करून विस्कटून टाकले व जीवे मारण्याची धमकी दिली हा प्रकार सुरू असताना सीमा चंपलोन या सोडवण्यासाठी गेल्या असता त्यांना देखील मारहाण करत त्यांचा विनयभंग चा प्रयत्न करण्यात आला या मारहानी मध्ये उमेश चंपलोन हे गंभीर रित्या जखमी होऊन त्यांचा हात मोडला आहे
या प्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करून अधिक तपास पोलीस करत आहेत.