दोडामार्ग l प्रतिनिधी :तालुक्यातील काल काही भागांत मुसळधार पाऊस झाला होता आज सकाळपासून वातावरण तापले होते मात्र दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने बाजारपेठेत चाकरमानी तसेच लग्न सराई साठी खरेदी करण्यासाठी आलेल्या जनतेची मोठी पंचाईत झाली होती अचानक कोसळलेल्या पावसामुळे शेतकरी सह सर्वसामान्य जनतेला सुखद धक्का बसला आहे ठीक ठिकाणी रस्त्यावर पावसामुळे पाणी साचले होते तर काही ठिकाणी रस्त्यात कामे सुरू असल्याने वाहतुकीस पुलाचे बांधकाम सुरू असल्याने गैरसोय झाली होती तसेच गटार भरून वाहत असल्याने रस्त्यावर चिखल साचला आहे याकडे लक्ष देण्याची मागणी जनतेतून होत आहे












