दोडामार्ग l प्रतिनिधी :दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावचे माजी सरपंच महादेव गवस यांचे अल्पशा आजाराने बांबोळी गोवा येथे उपचारा दरम्यान निधन झाले आहे, ते मोर्ले गावचे सरपंच असताना त्यांनी केलेली लोकाभीमुख कामे तसेच तळागाळातील लोकांशी असलेला लोकसंपर्क यामुळे मोर्ले पंचक्रोशीत त परिसरावर शोककळा पसरली आहे.
चार दिवसापूर्वी त्यांची तब्येत ढासळल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांनतर त्यांना अधिक उपाचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले होते मात्र उपचारास योग्य साथ देत नव्हते, त्यातच काल १४ मे रोजी संध्याकाळी त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. आज सकाळी त्यांच्या राहत्या गावी मोर्ले येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.












