माखजन l वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या ॲड.पी.आर.नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा एच एस सी चा निकाल ९८.६२%लागला आहे.
यामध्ये विज्ञान विभागाचा १००% निकाल लागला.या शाखेतून ६७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.यामध्ये जान्हवी उमेश पवार ६९% (प्रथम),प्रणाली संतोष पिसे ६२.८३%(द्वितीय),श्रुती सचिन वासकर ५८.८३%(तृतीय),तर कला शाखेचा निकाल १००% लागला.या शाखेत २३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये सानिका अनंत भायजे ६६.५०%(प्रथम),सिद्धी विलास बेंडके ६३.६७%(द्वितीय),आणि संभाजी कृष्णा डावल व क्रांती मिलिंद पवार यांना प्रत्येकी ५८% मिळाल्याने तृतीय क्रमांक विभागून मिळाला.
तर वाणिज्य शाखेचा निकाल ९६.३६ % लागला.या शाखेतून ५५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.यामध्ये प्रांजल शांताराम मोरे ८०% (प्रथम),दर्शन संदीप नाचरे ७६% द्वितीय,मनाली मारुती शिगवण ७४.३३% तृतीय क्रमांक पटकावला
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष किशोर साठे,मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर व अन्य संचालकांनी अभिनंदन केले आहे.











