सैतवडे प्रशालेची 100 % निकालाची यशस्वी परंपरा कायम

 

शैक्षणिक व सामाजिक संस्था, सैतवडे ता. जि. रत्नागिरीच्या न्यू इंग्लिश स्कूल,सैतवडे ता.रत्नागिरी व न्यू इंग्लिश स्कूल,पडवे ता. गुहागर

प्रशालाचा फेब्रुवारी मार्च 2025मध्ये घेण्यात आलेल्या एस. एस. सी. परीक्षेचा रिझल्ट 100% लागला आहे.

न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडे प्रशालेतील कुमार हर्ष वैभव साईलकर हा 82.20% गुण मिळवून प्रशालेत पहिला तर सैतवडे केंद्रात तिसरा आला आहे. कुमारी निलम संदेश पवार ही 79.40%गुण मिळवून प्रशालेत दुसरी तर कुमारी साक्षी सुरेश शिगवण ही 78% गुण मिळवून प्रशालेत तिसरी आली.या परीक्षेसाठी प्रशालेतून एकूण 26विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 6 विद्यार्थी first class with distinction, 18 विद्यार्थी first class व 2 विद्यार्थी second class मिळवून उत्तीर्ण झाले असून प्रशालाची 100% निकालाची परंपरा अखंडित राहिली आहे. प्रशालेतून पहिले तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन संस्थेचे अध्यक्ष श्री. सज्जाद अब्दुल करीम सय्यद, खजिनदार श्री. वहाबभाई खलपे, सदस्य- श्री. गणी दळवी, श्री. जावेद काझी,मुझफ्फार सय्यद, मुख्याध्यापिका श्रीम. सिद्धी लांजेकर शिक्षक श्री. संतोष चव्हाण सर, नसिम शेकासन मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे पालकांसमवेत बुके व पेढे देऊन अभिनंदन केले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.रमेश शिर्के,श्री.सूर्यकांत सागवेकर श्री. वझे, सैतवडेचे माजी सरपंच मा. श्री. सदाशिव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.प्रशालेचा एस. एस. सी. परीक्षेचा उत्कृष्ट रिझल्ट लागल्याबद्दल संस्था व पालक वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. आणि सर्वत्र यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.