वेंगुर्ले l प्रतिनिधी : सोल्जरॅथॉन मॅरेथॉन स्पर्धा भारतीय सैन्य दलाचा विजय दिन साजरा करण्याच्या निमित्ताने भारतभर गेल इंडिया प्रा. ली. आणी फीटिस्तान तर्फे साजरी करण्यात आली. यामध्ये वेंगुर्ला येथे एकूण ५० जणांनी सहभाग घेतला आणि शहीद झालेल्या सैनिकांना आणि जखमी झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना सॅल्यूट करण्यात आला.
या स्पर्धेसाठी फिटीस्तानने नेमलेल्या कॅप्टन प्रदीप वेंगुर्लेकर, अँबॅसेडर संतोष पेडणेकर तसेच मार्गदर्शक डॉ. प्रल्हाद मणचेकर यांचा विशेष पदक देऊन कंपनीने सत्कार केला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सिंधुदुर्गातील अल्ट्रा रनर आणि मार्गदर्शक डॉ. प्रशांत मडव तसेच भारतातील ख्यातनाम अल्ट्रा रनर श्री ओंकार पराडकर यांनी स्पर्धेतील सहभागींना मेडल देऊन व मा. वि. के. सिंग माजी लष्कर प्रमुख यांच्या स्वाक्षरीतील सर्टिफिकेट प्रदान करून सर्वांचा यथोचित सत्कार केला. तसेच सतत सातत्याने चालणारे श्री अशोक ठोंबरे यांना मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. मानपत्राचे वाचन डॉ. नामदेव मोरे यांनी केले. यावेळी डॉ. प्रशांत मडव, श्री ओंकार पराडकर, वेंगुर्ला फिटनेस फायटरचे प्रशिक्षक आणि अँबॅसेडर श्री संतोष पेडणेकर, कॅप्टन प्रदीप वेंगुर्लेकर, मार्गदर्शक डॉ. प्रल्हाद मणचेकर आणि व्ही एफ एफचे मोहन होडावडेकर आणि सौ. कविता भाटिया हे उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रास्ताविक श्री. प्रदीप वेंगुर्लेकर यांनी तसेच डॉ. मडव, श्री ओंकार पराडकर यांनी मार्गदर्शन आणि डॉ. प्रल्हाद मणचेकर यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार प्रदर्शन प्राध्यापक पाटोळे सर यांनी केले. पदक वितरण समारंभ वेंगुर्ला कॅम्प हायस्कूल मैदानात करण्यात आला. या कार्यक्रमासाठी डॉ. अमेय खानोलकर, डॉ. आर एम परब, प्राध्यापक बिराजदार सर, श्री लाडू जाधव, डॉ. अश्विनी माईंणकर आणि प्राध्यापक प्रदीप प्रभू आणि वेंगुर्ला फिटनेस फायटर च्या सर्व सभासदांनी विशेष मेहनत घेतली.











